सुस्वागतम.....मी श्री.मनोहर मणचेकर प्रशिक्षक, बृहन्मुंबई महानगरपालिका माझ्या ब्लॉगमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे..ब्लॉग अपडेट करण्याचे काम चालू आहे...

मजेशीर उखाणी


  • गडगड गेला गाडा नव्हे, सरसर गेला साप नव्हे, गळ्यात

जानवे ब्राह्मण नव्हे. (पाणी काढण्याचा रहाट)

खुलासाः पाण्याच्या रहाटाला घागर किंवा बादली बांधून ती आपण खाली सोडू लागलो की रहाटाला गडगड किंवा धडधड आवाजयुक्त गती मिळते आणि त्याला बांधलेला दोर सरकत खाली जातो. ते मोठे थोरले दोरखंड हेच जणू काय त्या रहाटाचे जानवे. 
  • पाऊस नाही, पाणी नाही, रान कसे हिरवे ?
कात नाही, चुना नाही, तोंड कसे रंगले ? (पोपट)
खुलासा :पाऊसपाण्यानेच हिरवेगार गवत उगवते किंवा झाडे झुडपे नवी पालवी येऊन हिरवीगार बनतात. पण तसे पाऊस पाणी नसताही हिरवेपणा आणि कात व चुना याच्या सोबतीखेरीज नुसतेच विड्याचे पान खाऊन तोंड रंगत नाही हे खरे असताही तोंडाचा लाललालपणा. असे साम्य कोठे आढळते ते या कोड्यात विचारलेले आहे. ‘पोपट’ या उत्तरात ते बरोबर आढळते.
  • काळी गाय, काटे खाय, पण पाण्याला पाहून उभी
रहाय.(वहाण)
खुलासा :वाहणा पाण्यात घालणारा मनुष्य काट्याकुट्यातून चालला तरी काटेवहाणेत शिरून तिच्यातच मोडतात, पण माणसाच्या पायांत शिरत नाहीत.नदीनाल्याजवळ आल्यावर माणसे आपल्या वहाणा भिजू नयेत म्हणून उभी राहूनचटकन त्या पायातून काढून हातात घेतात. या अनुभवातून हे कोडे निर्माण केलेले आहे.
  • वांकडकोके वाटेने जाय, तीन डोकी दहा पाय.
(बैल बांधलेला आणि हाकणारा सोबत असा नांगर)
खुलासाः ‘वांकडकोके’ विशेष वाकडेतिकडे, (नांगराची आकृती वाकडी असते .हे सर्वांनी पाहिले असेलच) शेतात नागर जुपला की दोन बैलाची दोन डोकी आणि नांगर हाकणाराचे तिसरे अशी तीन डोकी जमतात, आणि दोन बैलांचे प्रत्येकी ४प्रमाणे पाय व माणसाचे २मिळन १० पाय होतात.

  • काळी काठी तेल लाटी, लवते पण मोडत नाही
खुलासा : केला पिके पर्यंत काळे असतात, सदोदित तेल (लाटणे-आपल्याकडेच ओढणे) स्वाहा करीत असतात आणि लवणारे असल मोडतही नाहीत. या एकंदर अनुभवात या उखाण्याचा उगम आहे.

  • काळ्या कुरणात हत्ती चरतात.(उवा)
खलासा: काळ्या केसांच्या शेतात (जगलात) फिरणारे बारीकशा सॉरेे प्राणी बहिर्गोल भिगाने पहिल्यास, माणसाच्या शरीरातील रक्त शोषून घेण्यासाठी देखणा प्रमाणे उवांनाही बारीकशी ‘सोंड’ असल्याचे आढळून येईल
  • चार आले पाहुणे, चार केले घावने,
एकेकाच्या तोंडात दोन दोन. (लाकडी खाट)
खुलासा :लाकडी खाटेच्या चार पायांमध्ये खाटेच्या चारही बाजू पैकी प्रत्येक दोन बाजूची टोके बसविल्यामुळेच खाट तयार होते. हे नजरेत भरलेले असले म्हणजे या कोड्याचे उत्तर सहज आठवते.
  • पाटीलबुवा रामराम, दाढीमिशा लांबलांब. (मक्याचे कणीस)
खुलासा मक्याची कणसे सर्वांनी पाहिलेली असतात. त्यांना प्रत्येक सालीखाली पांढरे लांबसे केस असतात, हेही सर्वांनी पाहिलेले असेल.
  • पांढऱ्या पाण्यावर पासोड्या पसरल्या. (दुधावरची साय)
  • अब्बल पेटी, तब्बल पेटी, कुलूप किल्ली लागेना,
ज्याची त्यास उघडेना.(पोट)
खुलासा: पोट ही कडेकोट बंदोबस्ताची पेटी आहे. तीत अन्न भरता येते, पण ती उघडता येत नाही. कुलूपकिलीचीही तिला जरुरी नसते.
  • ओसाड मैदानांत कासव मेले;त्याचे सुतक गांवाला आलो.(ग्रहण)
खुलासा: यात कासव म्हणजे काळे पडलेले सूर्यबिंब किंवा चंद्रबिंब.ग्रहणाचा दोष मानतात हे सर्वांना माहीत आहेच.
 
  • काळ्या कातडीचे, निळ्या रंगाचे, फूल जाईचे, दूध
गाईचे. (करवंदीच्या झाडाचे फूल व फळ)
खुलासा: करवंदीच्या झाडाचे पान किंवा फळ तोडले तरी दुधासारखा चीक निघतो, तिच्या फुलाचे रूप व वास ही जाईच्या फुलासारखी असतात आणि फळ म्हणजेच करवंद पिकू लागताच निळसर होऊन पुढे अगदी काळेभोर बनते.

  • तार तार तारले, विजापूर मारले, बारा वर्षे तप केले
तरी हाती नाही लागले. (उंबराचे फूल)

  • घाटातून आला भट, धर शेंडी आपट. (शेंबूड)
खुलासा :जो हाताला लागल्याबरोबर एक क्षणही न दवडता आपण लगेच जोराने जमिनीवर किवा गटारात उडवतो तो शेंबूड हाच पदार्थ होय. नाकरूपी घाटातून तो बाहेर पडत असतो.

  • घाटावरून आला जोगी, सात पासोड्या भोगी. (कांदा)
खुलासाः काद्याला एकाच्या आत दुसरा याप्रमाणे निदान ५-६ तरी पापुद्रे असतात हे सर्वांना ठाऊक आहे.

  • सातां समुद्रांपलीकडे रामाने लावले अळे,
त्यावर दोनच फळे.(सूर्य, चंद्र)

  • सातां समुद्रांपलीकडे राजाने केला भात;
भांडे खातो अन् भात टाकतो. (खारीक)
खुलासा: खारकेचा बाहेरचा भाग खातात आणि आतली बी टाकतात.

  • एवढासा पोर, रुकाडी थोर.
(कोकणातील झाडांवरचे तांबडे मुंगळे ऊर्फ उंबील)
खुलासा: शिकार करणारा तो जसा ‘शिकारी’ त्याप्रमाणे झाडावर चढण्यात पटाईत असलेल्यांना ‘रुकडी’ म्हणतात. कोकणातले हे लाल मुंगळे झाडांवरच पानांची घरे करून राहतात.

 

  • एवढेसे पोर, घर राखण्यात थोर.(कुलूप)
  • नारोपंत, मोरोपंत, चिमाबाई, विसाजीपंत. (गुडगुडी)
  • भरल्या पृथ्वीत कोणत्या पाच चिजा नाहीत ?
खुलासा: (आकाशाला खांब नाही, समुद्राला झाकण नाही, तळहाताला केस नाही, जिभेला हाड नाही आणि घोड्याला स्तन नाही.) 

  • एका फुलाला पाच वास.
खुलासा: (एका दुधापासून साय, दही, ताक, लोणी व तूप हे पाच पदार्थ तयार होतात.)

  • आकाशातून पडली घार, तिला केली ठार;
रक्त पिऊ घटाघटा, मांस खाऊ मटामटा. (नारळ)

  • पाण्यापेक्षा पातळ, विषापेक्षा कडू, माझा उखाणा
ओळखील त्याला देईन सोन्याचा गडू. (धूर)

  • सातां समुद्रांपलीकडे राजाने केला भात,
एक एक नऊ नऊ हात.(शेवया)

  • चमचम टिकली वाटोळे दार,
हळूच घाल दादा, दुखते फार. (बांगडी)

  • तीन पायांची त्रिंबकराणी,
खाते लाकूड, पिते पाणी.(सहाण)
खुलासा: सहाणेला तीन पाय असतात. गंधासाठी तिच्यावर घासण्यात येणारे चंदन रोज थोडे थोडे कमी होत जाते. गंध उगाळायचे म्हणजे पाणीही लागतेच.

  • तीन पायांची तिपाई, वर बसला शिपाई. (तवा)
  • दात विचकते, बाजारात बसते, असे कोण ? (डाळिंब)
खुलासा: डाळिंब आत कसे आहे ते गिन्हाइकाला समजण्यासाठी त्याच्या फाका करून ठेवतात.

  • बत्तीस चिरे त्यांत नागीण फिरे. (जीभ)
  • निर्जीव नारी, पण पतिव्रता भारी. (वहाण)
खुलासा: ती ज्या पायाची असेल त्याच पायाला उपयोगी पडते; दुसऱ्या पायाला नाही.

  • वळण वांकडे, दिसायला फांकडे, त्याच्या जातीत
लाकडी, पण हरील मोठे सांकडे. (धनुष्य)
खुलासा: ते वाकडे असले तरी शोभिवंत दिसते. केवळ कांबट्याच्या (बांबू म्हणजे एक प्रकारचे लाकूडच) जातीचे असले तरी धनुष्यधारी माणसाचे प्राणसंकटातून रक्षण होते. कारण धनुष्यबाण ही हत्यारेच आहेत.
 
  • रत्नांत रत्न खरे, पण दरमहा एकदा मरे. (चंद्र)
खुलासा: चंद्र हा देवांनी समुद्रमंथन करून काढलेल्या १४ रत्नांतले एक मोठे रत्न आहे. पण दर अमावास्येस ते नाहीसे होते व शुद्ध प्रतिपदेस पुन: जन्म घेते.
  • ज्याचे अंग त्यालाच दिसेना असा कोण? (डोळा)
  • वाटीभर दही, तुला खाववेना अन् मला खाववेना.
(ओला चुना)
  • झोळझोळ झोळणा, आकाशी पाळणा, बायको
बाळंतीण नवरा तान्हा. (झाडावर पिकलेले चिंचेचे बोंड)
खुलासा: चिंचेच्या उंच झाडावर बाहेरील कवचाच्या आत चिंचेचे बोंड लोंबत असते. कवच हा चिंचेचा पाळणा. तो उंचावर असतो म्हणजे आकाशात असतो .चिंचेचा नवरा चिंचोका, पण तो असतो मात्र तिच्याच पोटात.
  • एवढासा गडू पाहून येते रडू.(कांदा)
  • सूपभर लाह्या, त्यामध्ये रुपया. (चंद्र)
खुलासा: आकाश हे सूप, चांदण्या लाह्या आणि चंद्र त्यांतला रुपया.
  • खणखण कुदळी, मणमण माती,
इंग्रजांनी राज्य घेतले मध्यरात्री.
(घूस)
खुलासाः घूस रात्रीच्या वेळी उकरून मातीचा ढीग जमिनीतून बाहेर काढत असते.
  • साता समुद्रा पलीकडे सीतेने सारवली जमीन,
वाळतां काही वाळत नाही.(जीभ)
खुलासाः जीभ नेहमी ओलीच असते, वाळत नाही.
  • एवढीशी मुलगी दोन तिटा लावते.(गुंज)
खुलासा: गुंजेचा अर्धा भाग काळा व अर्धा भाग लाल असे तिच्यात दोन रंग असतात.
  • गरीबशी बिबी, चुलीपाशी उभी. (कुंकणी)
  • कोरड्या विहिरीत पाखरे फडफडतात. (लाह्या)
खुलासा: तापलेल्या ‘खापरात’ (या नावाचे मातीचे एक भांडे असते.) जोंधळे घालून ते भाजून त्याच्या लाह्या बनवितात, तेव्हा त्यांचा फडफड असा आवाज होतो.
  • तांबडी पालखी हिरवा दांडा,
आत बसल्या बोडक्या रांडा (लाल मिरची)
खुलासा: मिरची पिकून लाल झाली तरी तिचा देठ हिरवाच असतो आणि तिचे बी आत घुडघुड वाजते.
  • भिंतीवरचे गाडगे हालते, पण पडत नाही. (डोके)
खुलासाः माणसाचे शरीर हीच एक भित. डोके त्याच्यावर असते आणि ते हवे तसे हलले तरी पडत नाही.
  • लवलव काठी सोन्याची पेटी,
आपण एकटी, पण शंभर धाकटी. (पोफळ)

खुलासाः पोफळीचे झाड बारीक, पण खूप उंच असते म्हणून वाऱ्याबरोबर इकडेतिकडे लवते. तिला पिवळसर रंगाचा एकच तुरा येतो, पण त्यातून शेकड्याना सुपाऱ्या निर्माण होतात.

  • वाजते पण ऐकू येत नाही.(थंडी)
खुलासा: थंडी वाजते’ असे म्हणण्याची पद्धती आहे. पण ‘वाजते’ म्हणज अंगाच्या कातडीला नुसती भासते. तिला आवाज नसतो.
  • रानातले लाकूड आणले घरा,
ते म्हणते मला बिंदली करा.
खुलासा: लाकडाचे मुसळ करावयाचे तर त्याच्या एका टोकाला लोखंडी वसवी(मुसळ) करून बसवावी लागते.
  • एवढीशी टिटवी, भरलेले तळे आटवी. (दिव्याची वात)
खुलासा: पणतीत, समई किंवा लामणदिव्यात तेल घातलेले असले, तरी त्यातली वात पेटविली म्हणजे ती हळूहळू सगळे तेल खाऊन टाकते.
  • चुलीत गेली अन् गर्भार होऊन आली. (भाकरी)
खुलासा: तव्यावरून काढून भाकरी चुलीत निखाऱ्यावर शेकायला टाकली की ती लगेच फुगते.
  • एवढीशी पोर, ओझे घेई थोर. (चुंबळ)
खुलासा: डोक्यावर चुंबळ ठेवून तिच्यावर ओझे घेतले म्हणजे थोडे जास्त ओझे असले तरी नेववते.
  • लहानसे झाड त्याला इवलासा दाणा,
गरज लागली असता धावत जाऊन आणा. (ओवा)
खुलासा: ओव्याचा दाणा अगदी बारीकसा असतो. तसेच त्याचे झाडही बारीक असते. पण तो इतका हटकून गुण देणारा आहे, की गरज पडली म्हणजे त्याच्यासाठी धावाधाव सुरू होते.
  • भले मोठे तपेले, भुईमध्ये लपले. (उखळ)
  • पैशाचे घेणे, पण जन्माचे लेणे.(कुंकू)
  • काकीला दोन कान, काकाला काही नाही; काकाचे
शहाणपण काकीला येत नाही. (कढई आणि झारा)
खुलासाः कढईला धरण्यासाठी दोन कान असतात. झाऱ्याला तसे काही नसते. पण झारा जितकी कामे करू शकतो तितकी कढईला करता येत नाहीत.
  • काळी घोडी लगाम तोडी
भल्याभल्यांची घरे फोडी.(घूस)
  • फूल आहे, पण वास येत नाही
उपयोग रोज केला, तरी सुकत नाही
(डोक्यात घालायचे ‘फूल’: एक दागिना)
  • वृक्षावर आहे पण पक्षी नव्हे, तीन डोळे आहेत पण शंकर
नव्हे, भगवे वस्त्र आहे पण गोसावी नव्हे आणि पाण्याने
भरलेला आहे पण घागर नव्हे किंवा मेघ नव्हे.
(न सोललेला नारळ)
  • एवढीशी मावशीबाई, देवाआधी नैवेद्य खाई. (माशी)
  • दोन पायांचा पक्षी, तो कठीण फळे भक्षी,
दाणा काही खाईना, पाणी काही पिईना. (अडकित्ता)
  • लाल छडी, मैदानमें खडी!
(ऊस)
  • दोन भाऊ शेजारी, भेट नाही संसारी. (डोळे)
  • अरे अरे म्हटले, पाणी परतले,
देठावाचून अमृत पिकले.
(मीठ)

  • घमघमाटा, विषाचा काटा, सोन्याच्या देवळात रुप्याच्या घाटा.(फणस)
  • काळ्यापोटी जन्मला, सूर्योदय झाला,
राजाचे घरी भोजनास गेला.
(पापड)
  • एक रांडे तीन शेंडे.(चूल)
  • दर्याकिनारी केळी लवतात, पण मोडत नाहीत. (बोटे)
  • रघुरघु राणा, पांची बोटे ताणा,
रघु माझा उडाला, भिंतीवर जाऊन बसला. (शेंबूड)
  • बाहेरच्या कुपीत ठेवला दाणा,
माझा उखाणा ओळखील तो चतुर शहाणा. (द्राक्ष)

 

  • बुरख्यावर बुरखे, बत्तीस बुरखे,
त्या नारीचे केस भुरके (मक्याचे कणीस)

 

  • छोटेसे घर त्यात पन्नास नारी,

स्वभाव त्यांचा तापट भारी (काडेपेटी)

  • वाडा माझा बावन्नखणी, त्यात राहतात राजाराणी
नोकर गुलाम दिमतीला, विदूषक आहे गमतीला
(पत्त्यांचा जोड)
  • एक अधाशी सदा भुकेला, कागद मागतो खायला,
तांबडा शर्ट, टोपी काळी, बसे एकटा तिन्ही त्रिकाळी
(पोस्टाची पेटी)
  • सकाळी आणि संध्याकाळी असते लांब लांब ती,
भर दुपारी उन्हात मात्र लपते पायाखाली ती (सावली)
  • दोन कान एकच पोट, पोटात बसते पुष्कळ काही
ज्याच्या घरांत नसेल ही, असा मात्र कुणीच नाही
(पिशवी)
  • दिसत नाही, बोलत नाही अशी गुप्तचर,
मनातून तुमच्या काढून घेते भराभर (परीक्षा)
  • आधी होता हिरवा, मग झाला लाल,
सर्वांचा झाला आवडता, किती खाऊन घ्याल (विडा)
  • पांढरा माझा झगा, डोळा माझा लाल,
जितकी उभी राहते तितकी होते लहान (मेणबत्ती)
  • तारतार तारशी, डोळ्यांपुढे आरशी
माझा उखाणा न जिंकशी तर घटकेत मरशी (झोप)

No comments:

Post a Comment